वृक्षारोपण मेळावा
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण उपक्रम.
सेवा हीच ईश्वरभक्ती — माणुसकी जपणे हाच धर्म — महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठान
समाजातील गरजू घटकांना आधार देण्यासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था
महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठान हे समाजातील गरजू, निराधार आणि वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी समर्पित आहे.
अनाथ मुलांना सुरक्षित वातावरण, ज्येष्ठ नागरिकांना आधार आणि गोमातेच्या संरक्षणासाठी गोशाळा अशा विविध माध्यमातून सेवाकार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
समाजसेवा
माणुसकीसाठी समर्पितआश्रय
गरजूंसाठी आधारगोसेवा
गोमातेचे संरक्षणसेवेच्या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठानचे कार्य
अनाथ व गरजू मुलांना सुरक्षित वातावरण, संगोपन, शिक्षण आणि प्रेमळ आधार मिळवून देण्यासाठी कार्य.
ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, सुरक्षित निवारा, आपुलकी आणि आवश्यक सहकार्य देण्याचा प्रयत्न.
गोमातेची सेवा, संरक्षण, संगोपन आणि गोसंवर्धनासाठी समर्पित उपक्रम.
समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत सेवाभाव पोहोचवणे
आमच्या कार्यामागील मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांना सन्मानाने जगण्याची संधी देणे हा आहे.
गरजूंसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करणे.
मुलांच्या शिक्षणाला आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे.
समाजातील दानशूर व्यक्ती व स्वयंसेवकांना सेवाकार्यात सहभागी करून घेणे.
आमच्या सामाजिक कार्यासाठी समर्पित काही क्षण — पूर्ण दृश्य (Full Image View)
महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांचे काही विशेष क्षण
महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने जिजाऊ जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने कोरेगाव भीमा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. पंचक्रोशीतील व्यक्तींनी उपस्थित राहून या महान कार्याला हातभार लावला.
महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे काही विशेष क्षणचित्रे — रक्तदात्यांच्या उत्साहाची साक्ष.
हळदी कुंकाच्या कार्यक्रमास खराडी येथील सुमनताई पठारे नगरसेविका यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
पेरणे फाटा नगर रोड येथे दुर्गा माता पुजा व आरतीचे भव्य आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
आषाढी एकादशीनिमित्त इंद्रायणी भजनी मंडळ, क्रांती पार्क, खराडी, पुणे यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने कोरेगाव भीमा येथे गणपती उत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करून अभिमानाने साजरा करण्यात आला.
आंबेडकर नगर येथे वाटपासाठी किट तयार करण्यात आले. त्यात गहू, तांदूळ, ज्वारी, तेल, पोहे व डाळ यांचा समावेश होता.
वर्धापन दिनानिमित्त चंदन नगर येथील गोरगरीब महिलांना तेल, तांदूळ, गहू, साखर, पोहे, तूरडाळ व मूगडाळ यांचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनच्या कठीण काळात महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठानने माहेर संस्थेला अन्नदान देऊन मानवतेचे दर्शन घडविले.
कोरेगाव भीमा येथील उत्सव रेसिडेन्सी सोसायटीच्या सचिव सौ. सायली पवार यांनी महिलांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले.
महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने अनाथ मुलांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्यांना मदत केली.
आपले सहकार्य, वेळ किंवा मदत गरजूंपर्यंत पोहोचवून समाजसेवेचा भाग बना.
महंत देवगिरी महाराज प्रतिष्ठानशी संपर्क साधण्यासाठी खालील माहिती वापरा
गट नंबर 695/2, फ्लॅट नंबर 101, उत्सव रेसिडेन्सी, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे - 412216